Saturday, June 13, 2020

another page from lock down

वेळ सत्कारणी लावायचा कंटाळा आलाय
सकाळी उठून व्यायाम करायचा कंटाळा आलाय
 नवीन  कायतरी शिकायचं बास झालं आता
ऑनलाईन शिकवण्या खूप झाल्या आता
 पंखे तरी किती वेळा पुसायचे
आणि कपाट किती वेळा लावायची
 क्लासिक सिनेमे शोधायचे
कळत नसलं  तरी बघायचे.
 काय  वाचायची  ती पुस्तकं
तेच ते शहाणपण आणि ज्ञान फुकाच
 बघून झाले सगळे फोटो जुने पुराणे
फेसबुक पण आता  झाले सूने सूने.
किती करायचं  कौतुक मोकळ्या झालेल्या हवेचं
 जीव कोंडलाय इकडे  कारण कुठच नाही जायचं
नको तो टी व्ही , नको त्या बातम्या , चर्चा आणि उपेक्षा
 तिथे दिसतात यातना आणि  विरतात सगळ्या अपेक्षा
    म्हणालं होत कुणीतरी आशेवरती जग चालतं
  जग तर थांबलय आता , मग आशेच काय करायचं  ?
........ दिलीप

No comments:

Post a Comment